उर्धुळ ग्रामपंचायतीसाठी अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे आपल्या गावाने आर आर आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार अंतर्गत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.
हा पुरस्कार गावातील स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, पाणी व्यवस्थापन, सार्वजनिक सुविधा आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग यांचे उत्कृष्ट प्रतिबिंब आहे. ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच व सदस्य, कर्मचारी आणि सर्व ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे उर्धुळ हे आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण करत आहे. हा सन्मान संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी असून भविष्यातही अधिक चांगले कार्य करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.




